लढत विधानसभेची : शिरपूरमध्ये काँग्रेस आमदार काशीराम पावरा हॅटट्रिक करणार का?

लढत विधानसभेची : शिरपूरमध्ये काँग्रेस आमदार काशीराम पावरा हॅटट्रिक करणार का?

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ नंदुरबार या लोकसभा मतदार संघात येतो. यंदाच्या निवडणुकीत या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आपला झेंडा फडकवतो की काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा हॅटट्रिक करतात? याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

  • Share this:

धुळे, 18 सप्टेंबर : धुळे जिल्ह्यातला शिरपूर हा विधानसभा मतदारसंघ 2009 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी होता पण 2009 तो राखीव झाला. तरीही आजपर्यंत अमरीश पटेल यांचं इथे वर्चस्व कायम आहे. 2009 ते आजपर्यंत काँग्रेसचे काशीराम पावरा हे या मतदारसंघाचे आमदार आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ नंदुरबार या लोकसभा मतदार संघात येतो. यंदाच्या निवडणुकीत या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आपला झेंडा फडकवतो की काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा हॅटट्रिक करतात? याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

इथे भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर काँग्रेसला आव्हान देण्याची तयारी करत आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी काशीराम पावरा यांना चांगली लढत दिली होती.

लढत विधानसभेची : कन्नडमधून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपला मताधिक्य होतं. यावरून विधानसभा निवडणुकीतही इथे भाजपचा झेंडा फडकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेस चिंतेत आहे. यंदा वंचित बहुजन आघाडीही इथे लढण्यासाठी इच्छुक आहे.

Loading...

विद्यमान आमदार काशीराम पावरा हे अमरीश पटेल यांचे खंदे समर्थक, विश्वासू म्हणून ओळखले जातात. पण भाजपचं इथलं वाढतं वर्चस्व आणि तरुणांचा कल पाहता इथे निवडणूक चुरशीची होणार हे नक्की.

2014 शिरपूर विधानसभा निवडणुकीत झालेलं मतदान

काशीराम पावरा (काँग्रेस ) - 98 हजार 114 ( विजयी )

डॉ . जितेंद्र ठाकूर ( भाजप ) - 72 हजार 913

जयवंत पाडवी - ( राष्ट्रवादी ) - 11 हजार 409

==========================================================================================

VIDEO किती जणांचे एन्काउंटर केले? पाहा प्रदीप शर्मांनी पहिल्यांदाच दिलंय यावरचं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...