शिर्डीमध्ये स्कुल बसला अपघात, 5 विद्यार्थी आणि शिक्षिका जखमी

शिर्डीमध्ये स्कुल बसला अपघात, 5 विद्यार्थी आणि शिक्षिका जखमी

बसमधील पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका किरकोळ जखमी झालेत. विजेची तार तुटल्याने मोठी दुर्घटना टळली.

  • Share this:

शिर्डी, 30 जून : शिर्डीमध्ये स्कुल बसला अपघात झाला आहे. राहाता तालुक्यातील घटना असून विजेच्या खांबावर स्कुल बस आदळून  उलटली आहे. बसमधील पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका किरकोळ जखमी झालेत. विजेची तार तुटल्याने मोठी दुर्घटना टळली. तर जखमींवर श्रीरामपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ही बस गणेशनगर येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलची होती. खराब रस्त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा

साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू

मुंबईत ट्रक आणि कारचा अपघात, 2 जण ठार

16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टींचा इशारा

First published: June 30, 2018, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading