शिर्डीतल्या साईमंदिराचं होत आहे भगवेकरण, ग्रामस्थांचा आरोप

शिर्डीतल्या साईमंदिराचं होत आहे भगवेकरण, ग्रामस्थांचा आरोप

सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराचं भगवेकरण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय

  • Share this:

हरीष दिमोटे, शिर्डी, 27 नोव्हेंबर : सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराचं भगवेकरण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मंदिराचे विश्वास्त हे भाजपचे असल्याने हे भगवेकरण होत असल्याचं निवेदन शिर्डीच्या ग्रामस्थांनी साई संस्थानला निवेदन दिले आहे. तर या निवेदनावर विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करू अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिलंय.

'सबका मिलिक एक है' ही साईबाबांची शिकवण होती. त्यामुळं सर्वधर्माचे लोक शिर्डीत येत असतात. साईबाबांचे सर्व धर्माचे भक्त होते ज्यांनी बाबांची सेवा केली. साईबाबांनी आपलं संपूर्ण जिवन शिर्डीतील्या एका पडक्या मशिदीत व्यतीत केलं. त्या जागेला द्वारकामाई मशीद असं म्हटलं जातं.

साईबाबांच्या हयातीत अनेक सण उत्सव सुरू झाले त्यात रामनवमी, गोकुळ अष्टमी, दीवाळी, गुढीपाडवा, वर्षभरातले जवळपास सर्वच हिंदू सण उत्सव साईबाबा असतानाच सुरू झाले होते त्यानंतर साईबाबा गेल्यानंतरही त्याच परंपरा आजही सुरू आहेत. मुस्लिम समाजातील भक्तांना देखील दररोज पुजेचा मान आहे दररोज सकाळी दहा वाजता मुस्लिम भक्त साई समाधीवर पुष्प अर्पण करतात. आजही ही परंपरा कायम आहे.

मात्र दोन वर्षांपूर्वी भाजप सरकारने सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाची नेमणूक केली आहे. तेव्हापासून मंदिराच्या भगवेकरणाला सुरूवात झाली असा आरोप ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात केलाय. मंदिर परीसरात असणारे सूचना फलक भगवे करण्यात आले.

द्वारकामाई मशिदीचं नाव बदलून व्दारकामाई मंदिर असं करण्यात आलं. तर समाधी शताब्दीचा ध्वज उभारण्यात आला त्यावरही केवळ हिंदू धर्माचेच प्रतीक लावण्यात आले.कुठेतरी साईबाबांना एका धर्मात बांधण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? असा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

शिर्डीतील काही ग्रामस्थांनी याबाबतचं निवदन संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांना दिलंय. हे निवेदन देऊन होत असलेलं भगवेकरण थांबवण्याची त्यांनी मागणी केलीय.

निवेदन देणाऱ्यांचे जे आक्षेप आहेत ते विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल अशी महिती कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिलीय.

Videos : विरोधकांवर गंभीर आरोप ते मराठा आरक्षणाची माहिती, मुख्यमंत्र्यांनी मांडलेले 10 मुद्दे

First published: November 27, 2018, 8:58 PM IST

ताज्या बातम्या