एक वर्षाच्या आतील चिमुरड्यांसाठी शिर्डीच्या साई संस्थानने घेतला हा निर्णय

एक वर्षाच्या आतील चिमुरड्यांसाठी शिर्डीच्या साई संस्थानने घेतला हा निर्णय

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येताना तुमच्यासोबत एक वर्षाच्या आतील बाळ असेल तर त्याची संस्थानच्या रजिस्टरमध्ये आता नोंद करावी लागणार आहे.

  • Share this:

शिर्डी, 1 जून- शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येताना तुमच्यासोबत एक वर्षाच्या आतील बाळ असेल तर त्याची संस्थानच्या रजिस्टरमध्ये आता नोंद करावी लागणार आहे. दरम्यान, साईमंदिरात शुक्रवारी एका महिलेने आपल्या पाच महिन्यांच्या मुलीला बेवारस सोडून दिले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून साई संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे साईमंदिराचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

एक महिला आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन साईमंदिरात आली होती. पण या महिलेने साईमंदिर परीसरात असणाऱ्या गुरूस्थान समोर आपल्या पाच महिन्यांच्या मुलीला बेवारस सोडून मंदिर परिसरातून धूम ठोकली होती. ही घटना मंदिर परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या गोंडस मुलीला तिच्या निर्दयी मातेने इथे का सोडून दिले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शिर्डी पोलीस आणि साईसंस्थान या महिलेचा शोध घेत आहे.

भाविक मंदिर परिसरात पाच गेटमधून प्रवेश करतात. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यांची ओळख पटवणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून आता एक वर्षाच्या आतील अपत्यास साई मंदिरात नेताना पालकांना आता गेटवरील रजिस्टरमध्ये नाव, पत्ता , मोबाईल क्रमांकांची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संस्थानने आजपासून याची अंमलबजावणी सुरू केल्याचे दीपक मुळगीकर यांनी माहिती दिली आहे.

साईमंदिर परीसरात या चिमुकलीला एका महिलेने सोडून दिले होते. ही महिला कोण आहे ? या मुलीला तिने का सोडून दिलं ? यासाठी शिर्डी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. एल गंगावणे यांनी सांगितले आहे.

VIDEO: नाशिकच्या गोदावरीत अजय देवगणने केलं वडिलांचं अस्थी विसर्जन

First published: June 1, 2019, 6:45 PM IST
Tags: Shirdi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading