साईमंदिरात 65 वर्षावरील व्यक्तींना बंदी, कशी असेल दर्शनाची व्यवस्था? जाणून घ्या

साईमंदिरात 65 वर्षावरील व्यक्तींना बंदी, कशी असेल दर्शनाची व्यवस्था? जाणून घ्या

शासनाच्या निर्देशानुसार साईदर्शन व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

  • Share this:

शिर्डी, 15 नोव्हेंबर : ठाकरे सरकारने राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर आता शिर्डीतील साईमंदिराच्या दर्शनासाठी विविध नियम करण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार साईदर्शन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तसंच 65 वर्षावरील व्यक्तींना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच लहान मुलं आणि गरोदर महिलांनाही दर्शनाची परवागनी नसणार आहे.

शिर्डीचं साईमंदिर भाविकांसाठी खुलं झालं असलं तरीही दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावं लागणार आहे. शिर्डीत दररोज सहा हजार भाविकांना दर्शन दिलं जाईल. त्यामुळे ऑनलाईन दर्शन बुकींग असणाऱ्यांनीच शिर्डीत यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे.

साई मंदिरात दर्शनासाठी कसे असतील नियम?

- दर्शनबारीत सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार

- मास्क लावणे बंधनकारक असणार

- ज्यांना कोविडची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांनाच साईमंदिरात प्रवेश

- ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला कोरोना रिपोर्ट सोबत आणावा

- संशयीत भाविकांची शिर्डीत होणार कोरोना टेस्ट

- साईबाबांच्या चारही आरतीला केवळ 80 लोकांना सहभागी होता येणार

- शिर्डीतील ग्रामस्थांना सकाळी एक तास दर्शनाला परवानगी

- शिर्डीकरांना सकाळी 05:45 ते 06:45 या वेळेतच दर्शन

- 3000 भाविकांना ऑनलाईन पास दिले जाणार

- 3000 भक्तांना शिर्डीतील भक्तनिवासात दिले जाणार पास

- साईदर्शनाला जाताना फुल हार नेण्यास बंदी

- मोबाईलफोन आणि इतर सामान नेण्यास बंदी

- शिर्डीत असणार जमावबंदी

Published by: Akshay Shitole
First published: November 15, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या