मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिर्डीच्या यात्रेत मोठी दुर्घटना, पाळणा तुटल्याने मोठा अपघात, Video

शिर्डीच्या यात्रेत मोठी दुर्घटना, पाळणा तुटल्याने मोठा अपघात, Video

शिर्डीच्या जत्रेमध्ये भीषण अपघात

शिर्डीच्या जत्रेमध्ये भीषण अपघात

शिर्डीच्या यात्रेमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेमधला पाळणा तुटल्यामुळे काहीजण जखमी झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India

हरीश दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 1 एप्रिल : साई संस्थानच्या प्रसादालयासमोर सुरू असलेल्या यात्रेत दुर्घटना घडली आहे. खालीवर होणाऱ्या ट्रॉलीचा एक पाळणा अचानक तुटला यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले, या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत.

शिर्डी गावात सध्या रामनवमी निमित्त गावात यात्रा सुरू आहे. या यात्रेत पाळणा तुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. खाली वर होणारा पाळणा तुटल्याने पाळण्यात बसण्यासाठी बाजूला उभे असलेले लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे ( वय 45) किशोर पोपट साळवे ( वय 50 ) यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय भूमी अंबादास साळवे ( वय 14 ) हिला डोक्याला जखम झाली आहे. प्रविण अल्हाट ( वय 45) जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान जखमींना तातडीने संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले असुन रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे तातडीने अपघात कक्षात दाखल झाले. त्यांनी रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आणि नंतर रूग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे रामनवमी उत्सवाला गालबोट लागले असून या‌ दुर्घटनेतील साळवे दाम्पत्य अत्यंत गरीब असून त्यांच्या पायांना गंभीर इजा झाल्याच‌ं कळतंय.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये सध्या यात्रा आणि जत्रा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कोरोनानंतर निर्बंध उठल्यानंतर भाविकही मोठ्या प्रमाणावर जत्रांमध्ये सहभागी होत आहेत, पण जत्रांमध्ये असणाऱ्या या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात, त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

First published:
top videos