Home /News /maharashtra /

तीन मुलाच्या बापाचं 18 वर्षीय तरुणीवर जडलं प्रेम, दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

तीन मुलाच्या बापाचं 18 वर्षीय तरुणीवर जडलं प्रेम, दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

काही दिवस दोघांमध्ये प्रेम फुलले. पण आपल्या प्रेमाचा शेवट गोड होणार नाही, हे दोघांना कळून चुकले होते.

    शिर्डी,5 फेब्रुवारी:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रेमीयुगुलाची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील साकीरवाडी येथील ही घटना घडली आहे. भाग्यश्री भांगरे (वय-18) आणि अशोक मारूती भांगरे (वय-32) अशी मृतांची नावे असून दोघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेली माहिती अशी की, मृत अशोक मारूती भांगरे हा विवाहीत असून त्याला तीन मुले आहेत. तरी तो गावातील 18 वर्षीय भाग्यश्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. काही दिवस दोघांमध्ये प्रेम फुलले. पण आपल्या प्रेमाचा शेवट गोड होणार नाही, हे दोघांना कळून चुकले होते. त्यामुळे दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. चुलत्याकडे आली होती भाग्यश्री... सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील राहणारी भाग्यश्री ही तिच्या चुलत्याकडे राहायला आली होती. ती शिवणकामाचा क्लास करत होती. या दरम्यान, अशोक आणि भाग्यश्रीमध्ये प्रेम फुलले. मात्र, अशोक विवाहीत होता. त्याला पत्नी आणि तीन मुले आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील, ही भीती दोघांनाही होती. प्रेमप्रकरण उघड होण्यापूर्वीच उचलले टोकाचं पाऊल.. आपल्या प्रेमाचा शेवट गोड होणार नाही, हे अशोक आणि भाग्यश्रीला कळून चुकले होते. त्यामुळे दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. साकीरवाडी येथील मारुती विठोबा भांगरे यांच्या शेतात अशोक आणि भाग्यश्रीने विषारी औषध प्राशन करून आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉस्टेबल कैलास नेहे तपास करत आहेत. नातेवाईकांचा 'हैदराबाद पोलीस' स्टाईल बदला दरम्यान,वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय, ही घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर संतापलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी नराधमाला मारहाण करून ठार मारलंय. या प्रकरणी राजूर पोलिसांत अत्याचाराचा आणि खूनाचा असे दोन गुन्हे दाखल झाले आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील शिरपुंजे गावात एका ५५ वर्षीय महिलेवर गावातीलच ४५ वर्षीय राजू गणपत सोनवणे या व्यक्तीने अत्याचार केला. यावेळी पीडित महिलेने सदर घटना घरी सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सदर आरोपीला गावात मारहाण केली. आरोपी पळून जावू नये म्हणून दगडी बाकाला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशन राजूरला आण्यात आलं. जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीला पोलिसांनी राजूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. परंतु, प्रकृती गंभीर असल्यानं नाशिकला हलवण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजुर पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीच्या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल पहिल्या गुन्ह्याबाबत पीडित ५५ वर्षीय महिलेनं फिर्याद दिली असून यात म्हटलं आहे की, ४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास जायणावाडी गावच्या शिवारात खंडोबाचे माळावर जणावरं चारण्यासाठी गेलेली असताना आरोपी राजू गणपत सोनवणे ( वय ४५रा.शिरपुंजे) याने पीडितेची दोन्ही हाताला कवळी मारून खाली पाडले आणि अत्याचार केला. आरोपीवर गु.र.न.३१/२०२०भा.द.वी.कलम ३७६प्रमाणे दाखल केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ४ फेब्रुवारी २०२० रोजी शिरपुंजे येथील महिलेवर अत्याचाराच्या घटनेनंतर दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान, सदर घटनेचा राग मनात धरून तीन जणांनी आरोपी राजू सोनवणे याला जबर मारहाण केली होती. त्यात तो मयत झाला. या फिर्यादीवरुन तीन जणांविरुद्ध गु.र.न.३७/२०२० भा.द.वी.कलम ३०२,३४ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन पाटील करत आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Akola crime, Shirdi news

    पुढील बातम्या