शिर्डी, 20 नोव्हेंबर : सणसुदीनंतर समोर आलेल्या हत्याकांडानं शिर्डी हादरलं आहे. रवींद्र माळी उर्फ पिण्याची अज्ञातांनी मिळून धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या केली. रात्री दहाच्या सुमारास पिण्याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र रात्री घराबाहेर असताना काही अज्ञातांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शिर्डी हादरलं आहे.
शिर्डीत पुन्हा एकदा गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. या प्रकरणी स्थानिकांनी तातडीनं आरोपीला अटक करावी अशी मागणी जोर लावून धरली आहे. गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यानं मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आतापर्यंत एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
हे वाचा-सुशांतसिंगच्या आत्महत्येचं भांडवल करुन YouTuberनं कमावले चक्क 15 लाख रुपये
एकीकडे आता शिर्डीमध्ये साई मंदिरात हळूहळू भाविकांना दर्शनासाठी परवागी दिली जात आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व गोष्टींचं पालन करून भाविकांना दर्शन दिलं जात असतानाच अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्यानं शिर्डी हादरलं आहे. पोलिसांनी गुंडगिरीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाची कसून चौकशी देखील केली आहे. मृत तरुणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.