गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईभक्तांची गर्दी

गुरूपौर्णिमेनिमित्त  शिर्डीत साईभक्तांची  गर्दी

तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला शनिवारीच सुरुवात झालीय.

  • Share this:

09 जुलै : गुरूपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या आराध्य गुरूंचे पूजन आणि दर्शन करण्याचा दिवस.आज राज्यातील अनेक मंदिरासोबत शिर्डीतही भक्तांची मांदियाळी बघायला मिळते. यावर्षीही गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीत साईदर्शनाला भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला शनिवारीच सुरुवात झालीय. आजच्या मुख्य दिवशी कार्यक्रमांची रेलचेल आहे तर साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. हजारो साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डी भक्तांच्या गर्दीने अगदी फुलून गेली आहे.

शिर्डीत आज गुरूपौर्णिमेपासून साईचरण पादुका दर्शनासाठी खास योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेमध्ये संस्थानाला पंचवीस हजारांपेक्षा जास्त रूपयांचं दान देणाऱ्या भक्तांना चांदीच्या पादुकांचा प्रसाद देण्यात येणार आहे. गुरूपौर्णिमा उत्सवापासूनच या योजनेचा शुभारंभ झालाय. या अंतर्गत दहा ग्रॅमच्या चांदीच्या पादुका द्यायला सुरूवात करण्यात आलीय.

First published: July 9, 2017, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading