शिर्डी विमानतळाची कमाल, भक्तांसाठी फडणवीस सरकार करणार मोठा बदल

शिर्डी विमानतळाची कमाल, भक्तांसाठी फडणवीस सरकार करणार मोठा बदल

शिर्डीला जाण्यासाठी हवाई मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी जगभरातून मागणी जोर धरत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेत फडणवीस सरकारने विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

शिर्डी, 14 जुलै: मुंबई-शिर्डी विमानतळ सुरू होऊन अवघे 20 महिने पुर्ण झाले आहेत आणि एवढ्या कमी वेळात या शिर्डी हवाई प्रवासाची मागणी करण्यात येत आहे. शिर्डीला जाण्यासाठी हवाई मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी जगभरातून मागणी जोर धरत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेत फडणवीस सरकारने विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीला यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

शिर्डी विमानतळावर टर्मिनल भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांत शिर्डीला येणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. तर देशभरातील प्रवाशांनाही हवाई मार्गे शिर्डीला येता येणार आहे. बुधवारी सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमरावतीच्या बरोरा, पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर हवाई मार्गांची प्रगती झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अमरावती विमानतळावर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. इतर एअरपोर्टचे आणि रनवेचं काम लवकरच सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आयोजित बैठकीमध्ये 'उड्डान योजना' आणि 'क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी योजने'च्या अंतर्गत अनेक एअरपोर्टची कामं सुरू करण्यात येणार आहेत.

20 महिन्यांनी विस्ताराला मिळाला हिरवा कंदील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 1 ऑक्टोबर 2017 ला शिर्डी विमानतळाचं उद्घाटन केलं होतं. त्याच दिवशी त्यांनी विमानतळ देशाला समर्पित केलं. शिर्डी विमानतळ हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. इथे साई बाबांचं प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. तिथे रोज लाखोंनी भक्त दाखल होत असतात. गुरुवार, शनिवार आणि रविवारी शिर्डी भक्तांची संख्या लक्षणीय असते. शिर्डी विमानतळाची मालकी आणि विकास एमएडीसी विमानतळ विकास कंपनीजवळ आहे, जे राज्यात विमानतळ विकसित करण्यासाठी एक विशेष युनिट आहे.

शिर्डीला जाण्यासाठी हवाई मार्ग उपलब्ध झाल्यामुळे साई बाबांच्या नगरीत भक्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराची मागणी पुढे आली आहे. या मागणीचा विचार करत विमानतळ विस्ताराची परवानगी फडणवीस सरकारकडून देण्यात आली आहे.

प्रतिदिन 12 विमानं शिर्डीत उतरतात...

साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव दिपक मदूकर मुगलीकर यांनी सांगितल्याप्रमाणे, शिर्डीत रोज 12 विमान उतरतात. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, भोपाळ, हैद्राबाद, बंगळुरू यांचा समावेश आहे. रोज तब्बल 17,000 लोक हवाई मार्गे शिर्डीत दाखल होतात. अशात इंदोर आणि कोयंबतूरमधून शिर्डीमध्ये जाण्यासाठी हवाई मार्गीची मागणी वाढत आहे.

VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!

First published: July 14, 2019, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading