VIDEO : विहिरीत पाणीच नाहीतर निघाल्या 11 दुचाकी!

VIDEO : विहिरीत पाणीच नाहीतर निघाल्या 11 दुचाकी!

अकोले तालुक्यातील कळस गावातील ही घटना आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 22 डिसेंबर : जिल्ह्यातील कळस गावात विहिरीत चोरीच्या दुचाकी सापडल्या आहेत. पाण्यावर आलेला ऑईलचा तवंग बघून संशय आल्यानं टाकलेल्या गळाला दुचाकी लागल्यात आहे. आत्तापर्यंत अकरा दुचाकी काढल्या असून अजूनही अनेक गाड्या या विहिरीत असण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्यातील कळस गावातील ही घटना आहे. गावातील प्रवरा नदीच्या जवळ असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जुन्या विहिरीत ऑईलचा तवंग आल्याचं पाहून नागरिकांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर विहिरीत गळ टाकला असता त्यातून दुचाकी निघाली. अशा एक, दोन नाही तर जवळपास 11 मोटरसायकल विहिरीतून बाहेर काढल्या आहेत.

विहिरीत पाणी जास्त असल्यानं आता पाण्याचा पंप लावून पाणी बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर आणखी किती दुचाकी या विहिरीत आहे याची माहिती मिळू शकणार आहे.

आत्तापर्यंत निघालेल्या या मोटरसायकल दीड दोन वर्षांपूर्वी अकोले आणि संगमनेर तालुक्यातून चोरीला गेलेल्या आहेत. चोरांनी या गाड्यांचे काही पार्ट काढून घेतले आणि दुचाकी विहिरीत टाकून दिल्या असल्याचं कळत आहे.

परिसरातील आणखीही विहिरीत गाड्या आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा प्रकारे गाड्या चोरून विहिरीत का टाकून दिल्या ? हा प्रश्न आहे. आता पोलिसांसमोर या दुचाकी चोरांना पकडण्याचं आवाहन आहे.

=====================

First published: December 22, 2018, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading