मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंचं आव्हान स्विकारलं; शिंदे गटाकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन!

आदित्य ठाकरेंचं आव्हान स्विकारलं; शिंदे गटाकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन!

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. वरळीमध्ये उद्या शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला हे प्रत्युत्तर मानले जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. वरळीमध्ये उद्या बाळासाहेबांची शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या शक्तिप्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन आपल्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते, या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून आता वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

भाजपचे मंत्री होणार सहभागी 

मंगळवारी शिंदे गटाकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या शक्तिप्रदर्शनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून, त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्यात भाजपचे अनेक मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत. वरळी स्पोर्ट क्लब येथे हा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते, त्यानंतर आता अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच बाळासाहेबांची शिवसेना वरळीमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहे.

हेही वाचा : एका पाठोपाठ 3 ट्वीट, मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचलं!

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? 

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की, त्यांनी राजीनामा देऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Shiv sena