मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची दंबगगिरी, व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात LIVE VIDEO

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची दंबगगिरी, व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात LIVE VIDEO

कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले त्यामुळे बांगर संतापले आणि....

कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले त्यामुळे बांगर संतापले आणि....

कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले त्यामुळे बांगर संतापले आणि....

  • Published by:  sachin Salve
मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 15 ऑगस्ट : शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे (hingoli) आमदार संतोष बांगर (mla santosh bangar) या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता तर कामगार विभागाच्या मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर यांनी भांडाफोड केला आहे. यावेळी  संतप्त झालेल्या  बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजन वाटप केले जाते. याच मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आज आमदार संतोष बांगर यांनी भांडाफोड केला आहे. हिंगोली शहराजवळील एमआयडीसी भागात जिल्ह्यातील कामगारांसाठी एकत्रित अन्न शिजवले जाते व येथून हे अन्न जिल्हाभरातील कामगारांना दुपारच्या वेळी वितरीत केले जाते. परंतु आमदार बांगर यांना या जेवणाविषयी तक्रार आली होती. त्यामुळे आज आमदार बांगर यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहे. बुरशीजन्य डाळी, भाज्या, करपलेल्या चपात्या व अन्न शिजवण्याच्या ठिकाणी घाण आढळून आल्याने बांगर चांगलेच संतप्त झाले. (महिलांनी मेहनतीच्या जोरावर मंत्रिपद मिळवलं तर अधिक चांगलं : अमृता फडवणीस) संतप्त झालेल्या आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला या प्रकाराचा जाब विचारला. पण उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदार बांगर यांनी तिथे उपस्थित व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.  गरीब लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार पाहून बांगर यांनी कंत्राटदारालाही फोनवरून चांगलेच खडसावले. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
First published:

पुढील बातम्या