मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बाप कधीही चोरता येत नसतो, बाळासाहेब हे कोणाचे..'; शिंदे गटातील आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं

'बाप कधीही चोरता येत नसतो, बाळासाहेब हे कोणाचे..'; शिंदे गटातील आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं

फाईल फोटो

फाईल फोटो

एकेकाळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे ठाकरे परिवाराबद्दल ब्र ऐकून घेत नव्हते. मात्र आता शिंदे गटात सामील झाल्याने त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आपल्या शैलीत सुनावलं आहे.

    राहुल खंदारे, बुलडाणा 23 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील नेते आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाही अनेकदा दिसतात. एकेकाळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे ठाकरे परिवाराबद्दल ब्र ऐकून घेत नव्हते. मात्र आता शिंदे गटात सामील झाल्याने त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आपल्या शैलीत सुनावलं आहे. NIA चा PFI वर 'सर्जिकल स्ट्राईक', प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा... माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये "बाप चोरणारी टोळी" असा शिंदे गटाचा उल्लेख केला होता. त्यावर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत आणि महापुरुष हे कुणा एकट्याचे नसून ते देशाचे असतात. अशा महापुरुषांचा आदर्श जोपासून त्यावर मार्गक्रमण करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बाप कधीही चोरता येत नसतो हे सर्वांनी लक्षात ठेवावं', असं बोलत आमदार गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते आमदार गायकवाड यांच्या कानात काहीतरी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाड यांना काय सल्ला दिला असेल यावरून अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. मात्र त्यालाही आमदार गायकवाड यांनी पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदेंचे आमदार खासगीत काय बोलतात? जयंत पाटलांनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी याआधी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका करत त्यांच्या हिंदीची खिल्ली उडवली होती. यावर प्रत्युत्तर देत गायकवाड यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला होता. 'मला हिंदी बोलता येत नाही अशी टीका अजित पवारांनी केली होती. मी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला मराठी रांगडा माणूस आहे. मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून आलो नाही', असं प्रत्युत्तर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिलं होतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Cm eknath shinde, Uddhav thackeray

    पुढील बातम्या