मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाच्या आमदाराकडून प्रचारसभेतच शरद पवारांचं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

शिंदे गटाच्या आमदाराकडून प्रचारसभेतच शरद पवारांचं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

भाजप-शिंदे गटाच्या वतीने बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षेखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रचार मेळाव्यात बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Kiran Pharate

नितीन नांदुरकर, जळगाव 25 नोव्हेंबर : जळगाव दूध संघाची निवडणूक येत्या दहा डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आज भाजप-शिंदे गटाच्या वतीने बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षेखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रचार मेळाव्यात बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. यामुळे हा राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी भाजप आमदार मंगेश चव्हाणदेखील उपस्थित होते.

कोश्यारींसह फडणवीस निघाले दिल्लीला, राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चेची शक्यता

प्रचार सभेत आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत आपण सुरुवातीपासून दूध संघाच्या कधी चेअरमन तर कधी संचालक मंडळावर राहिलो असल्याचं सांगितलं. यावेळी चिमणराव म्हणाले, की आपल्या अध्यक्ष पदाच्या काळात अतिशय कठीण परिस्थितीमध्ये दूध संघ असताना आपण त्याचं दूध संकलन वाढवत नेत ते मोठ्या पातळीवर नेलं होतं. मात्र जास्तीच्या या दुधाला राज्यात मागणी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.

यावर कशी मात केली हे सांगताना ते म्हणाले, की या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही रेल्वेद्वारे कोलकत्ता येथे दूध पाठविण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दूध संघासाठी खूपच फायदेशीर ठरला होता. दूध संघ चांगला नफ्यात तर आलाच शिवाय रेल्वेद्वारे पहिल्यांदा इतर राज्यात दूध पाठविणारा जळगाव दूध संघ हा देशात पहिला ठरल्याने तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील दुग्ध मंत्र्याना शुभारंभासाठी पाठविले होते.

'भाजप शिस्तबद्ध पक्ष, बोम्मई असं बोलूच शकत नाहीत, पण...'; सीमावादाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

शरद पवार यांची ही दूर दृष्टी आपल्याला आवडली असल्याचं चिमणराव पाटील यांनी मेळाव्यात बोलताना सांगितलं आहे. राजकारणात आपण एका ठराविक मर्यादेपर्यंत राजकीय विरोध करायला हवा आणि चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं आपल्याला वाटतं असल्याचं चिमणराव पाटील म्हणाले. आजच्या काळात सुरू असलेल्या राजकारणात असलेली कटुता आणि राजकीय क्षेत्रात विरोधाला विरोध करण्याच्या भूमिकेला एकप्रकारे चपराक दिली असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं.

First published:

Tags: Eknath Shinde, Jalgaon, Sharad Pawar