मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राऊतांविरोधात लोकसभा लढवणार का? दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

राऊतांविरोधात लोकसभा लढवणार का? दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभेच्या उमेदवारीबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

लोकसभेच्या उमेदवारीबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

दीपक केसरकर यांना शिंदे गटाकडून लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sindhudurg, India

सिंधुदुर्ग, 26 मे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांची विधानं ही  कन्फ्युजन निर्माण करणारी असतात. ते भविष्य सांगणाऱ्या पोपटाप्रमाणे रोज एक कार्ड काढतात. शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं ही प्रकाश आंबेडकरांची सूचना योग्य आहे. महाविकास आघाडी शिवसेना संपवतीये हे खरं असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले केसरकर? 

दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत यांची विधानं ही  कन्फ्युजन निर्माण करणारी असतात. ते भविष्य सांगणाऱ्या पोपटाप्रमाणे रोज एक कार्ड काढतात. आम्ही पैसे घतेल्याचे संजय राऊत यांनी एकदा तरी सिद्ध करून दाखवावं. आम्ही स्वतःला विकायला बसलो नाहीत. आमची ज्यांनी काळजी घेतली त्यांच्यासोबत आज आम्ही आहोत, राऊतांकडे गाड्या संपत्ती कुठून आली हे त्यांना विचारा असा घणाघात केसरकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया 

दरम्यान दीपक केसरकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारले असता, मला दिल्लीत जाण्यात रस नाही. मी शिक्षण मंत्री म्हणून चांगले काम करत नाही असे तुम्हाला वाटते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, विनायक राऊत यांच्याविरोधात लढण्याची माझी इच्छा नाही, परंतु पक्षाने आदेश दिला तर समोर कोण हे दुय्यम आहे.

First published:
top videos