Home /News /maharashtra /

मंत्रिमंडळात भाजपचा राष्ट्रवादीचाच फॉर्म्युला, फडणवीस नागपूरहून रवाना, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार!

मंत्रिमंडळात भाजपचा राष्ट्रवादीचाच फॉर्म्युला, फडणवीस नागपूरहून रवाना, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार!

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आणि शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता आठवडा होत आला आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आतापर्यंत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यानी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 जुलै : महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आणि शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता आठवडा होत आला आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आतापर्यंत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यानी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच नागपूरमध्ये सांगितलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस काल पहिल्यांदाच नागपूरला आले होते, तेव्हा त्यांचं होम ग्राऊंडवर जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूरहून फडणवीस आता मुंबईला निघाले आहेत, आज संध्याकाळी किंवा रात्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचाच जुना फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडे गृह, अर्थ आणि महसूल ही महत्त्वाची खाती जातील, अशी माहिती आहे. तर एकनाथ शिंदे याआधी त्यांच्याकडे असलेलं नगरविकास आणि एमएसआरडीसी हे खातं स्वत:कडे ठेवतात का, ते पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असेल जवळपास 50 आमदार आहेत. यातले 8 महाविकासआघाडी सरकारमधले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देताना शिंदे आणि फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याशिवाय भाजपचे स्वत:चे 106 आमदार आहेत. ज्या आमदारांना मंत्रीपद मिळणार नाही, त्यांची वेगवेगळ्या महामंडळांवर वर्णी लागू शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या