• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • होय नाही करत अखेर देवांच्या पालख्या आल्या दारात! कोकणात शिमगोत्सव उत्साहात

होय नाही करत अखेर देवांच्या पालख्या आल्या दारात! कोकणात शिमगोत्सव उत्साहात

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ चंडिका देवीची पालखी सोहळा फाग पंचमी पासून सुरू झाला असून देवीच्या पालखीत देवीचे मुखवटे ठेऊन दागिन्यांनी सजवण्यात आले आहेत.

  • Share this:
दापोली, 18 मार्च: कोरोनाच्या भीतीमुळे (Coronavirus in Maharashtra) जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा कोकणात होळीच्या (Holi celebration in Konkan) पालख्या दारोदारी नाचवता येणार नाहीत, असा आदेश काढला होता. पण नंतर यू टर्न घेत घराघरात पालख्या नेण्याला परवानगी देण्यात आली आणि गुरुवारापासून कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. कोकणातील शिमगोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट असून शासनाने घालून दिलेल्या निर्बंधात शिमगोत्सव साजरा होत आहे. कोकणातील शिमगोत्सवातील देव देवीच्या पालख्या फाल्गुन पंचमीला देवळातून बाहेर पडल्या. पालख्यांचा मार्ग मोकळा झाल्यावर लगेच पालखीची सजावट करण्यात आली आणि देवीचे मुखवटे सजवून पालखीत ठेवण्यात आलेत. देवी -देवतांच्या पालख्या भक्ताच्या भेटीला देवळा बाहेर पडल्या आहेत. आता नवीन आदेशानुसार होळी आणि शिमाग्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देवीदेवतांच्या पालख्या आता घरोघरी दर्शनासाठी नेण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दिली आहे. पण यासाठी सौम्य निर्बंध लादले आहेत. या पालखी सोबत केवळ 25 लोकांना एकत्रित येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखीसोबत असणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी आणि शारीरिक अंतर राखणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आज 15 मार्च रोजीच्या नवीन परिपत्रकानुसार काही नियम आणि अटींसह पालखी जाणार घरोघरी घेवून जाता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ चंडिका देवीची पालखी सोहळा फाग पंचमी पासून सुरू झाला असून देवीच्या पालखीत देवीचे मुखवटे ठेऊन दागिन्यांनी सजवण्यात आले आहेत. गुरुवारी पहिली होळी मंदिरासमोर पेटविण्यात आली. फाल्गुन पंचमीपासून रंगपंचमी पर्यंत शिमगोत्सव साजरा होतो. पुण्या-मुंबईच्या लोकांना कोरोना टेस्ट अनिवार्य जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी काही नियम घालून दिले आहेत आणि त्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वर्षी मुंबई, पुणेकर आणि बाहेरच्या शहरातील लोकांना येताना कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन मधील लोकांवर करडी नजर असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे नियम लावण्यात आले आहेत.
First published: