• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • इलो रे शिमगोत्सव इलो; आज कोकणात पेटली पहिली होळी

इलो रे शिमगोत्सव इलो; आज कोकणात पेटली पहिली होळी

कोकणातल्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज शिमगोत्सवातील पहिली होळी पेटवण्यात आली.

  • Share this:
21 फेब्रुवारी : कोकणातल्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज शिमगोत्सवातील पहिली होळी पेटवण्यात आली. कोकणातल्या ठिकठिकाणी होळीची पूजा करून होळ्या पेटवल्या जातात. पारंपारिक पद्धतीने या होळीत फाका पडतात, गावातील मंडळी सगळ्यांच्या भल्यासाठी होळीसमोर गाऱ्हाणं घालतात. त्यामुळे कोकणात सध्या उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. गावातील मानकरी व तरुण वाजत गाजत होळीला लागणारी शेवरची झाड रात्रीच जाऊन तोडतात. ती तोडण्याआधी त्या झाडांची पूजा केली जाते. वाजत-गाजत तरुण मंडळी शेवरचे झाड होळीच्या ठिकाणी घेऊन येतात व शेवर उभी केली जाते. कोकणातल्या शिमग्यात होळीमध्ये शेवरच्या झाडांना खूप मान असतो. पारंपरिक पद्धतीने फाक म्हणत होळी पेटविली जाते. तरुण मंडळी होळीचा चांगलाच आनंद लुटतात.
First published: