निवडणुकीनंतरही मेगाभरती जोरात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीतील आमदाराचा भाजपला पाठिंबा

महाआघातील एका आमदाराने आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

महाआघातील एका आमदाराने आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

  • Share this:
    नांदेड, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता राखण्यास भाजप आणि शिवसेनेला यश आलं आहे. निवडणुकीआधी युतीतील दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचत विरोधकांना दुर्बल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच आता निकालानंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. महाआघातील एका आमदाराने आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शेकापच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिला आहे. लोहा मतदार संघातून निवडून आलेले शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. तसंच नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत श्यामसुंदर शिंदे मुंबईलाही रवाना झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. भाजप - शिवसेना महायुतीला 162 जागा मिळाल्या तर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला 105 जागा मिळाल्या. तर मनसेला 1 जागा मिळाली. इतर विजयी उमेदवारांची संख्या 20 आहे. हा निकाल पाहिला तर राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट आहे पण भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेमध्ये बऱ्याच वाटाघाटी होणार असं चित्र आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला 50- 50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. सत्तेत समान वाटा हवा, असाच सेनेचा आग्रह आहे. आता शिवसेनेचा फॉर्म्युला भाजप स्वीकारणार का ते पाहावं लागेल. भाजपला 106 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 51 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला. भाजपला बंडखोरीचा फटका महाराष्ट्रासोबतच हरियाणा विधानसभेचा निकाल पाहता दोन्ही राज्यांत सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रात भाजपला बंडखोरीचा फटका बसला पण 15 बंडखोर आपल्या संपर्कात आहेत आणि ते महायुतीत येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. खरा पैलवान कोण? या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मात्र बाजीगर ठरले, असाच सगळ्यांचा सूर आहे. शरद पवारांनी शेवटपर्यंत लढत दिली आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळवून दिलं.सातारा लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने हा बालेकिल्ला राखला आणि भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना हार पत्करावी लागली. VIDEO: भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी; 'या' जिल्ह्यात सुपडासाफ
    Published by:Akshay Shitole
    First published: