शीना बोरा हत्याकांड : तब्बल 4 वर्षानंतर पीटर मुखर्जींना जामीन मंजूर झाला, पण...

शीना बोरा हत्याकांड : तब्बल 4 वर्षानंतर पीटर मुखर्जींना जामीन मंजूर झाला, पण...

मंजूर झालेल्या जामीनावर न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 6 फेब्रुवारी : शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र या जामीनावर 6 आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाचा हा निर्णय़ घेतला आहे. मंजूर झालेल्या जामीनावर न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह सर्व आरोपींवर 2017 मध्ये हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. यात पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय याच्यावर हत्येचा आरोप निश्चित करण्‍यात आला होता.

एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी 2016 मध्ये शीनाची आई इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय याला अटक केली होती.

इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जीला याला सीबीआयने अटक केली होती. पीटरवर गुन्ह्याची माहिती लपवणे आणि कटात सहभागी होणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

First published: February 6, 2020, 4:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या