नांदेडच्या महापौरपदी शीला भवरे

नांदेडच्या महापौरपदी शीला भवरे

अकरा वाजता निवड प्रक्रिया झाली. 74 सदस्यांनी हात उंचावून शीला भवरेला मत दिलं.

  • Share this:

नांदेड,01 नोव्हेंबर: नांदेड महापालिकेच्या महापौरपदी शीला भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड  झाली आहे.  अकरा वाजता निवड प्रक्रिया झाली.  74 सदस्यांनी  हात उंचावून शीला भवरेला मत दिलं.

महापालिका निवडणुकीत एकूण 81पैकी तब्बल 73 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पदांवर काँग्रेसचे उमेदवार विराजमान होणार हे निश्चित होतं.पण एका अपक्षाने देखील शीतल भवरे यांना पाठिंबा दिला आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. महापौरपदासाठी काँग्रेसने शीला भवरे यांना उमेदवारी दिली तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. या दोन्ही उमेदवारांची निवड निश्चित होती.  निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी भाजपाने उमेदवार दिले , पण पालिका निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील भाजपाचा पराभव झाला.

First Published: Nov 1, 2017 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading