दोनदा रुग्णालयात गेली तरी दाखल करून घेतलं नाही, अखेर घरीच झाली महिलेची प्रसूती

दोनदा रुग्णालयात गेली तरी दाखल करून घेतलं नाही, अखेर घरीच झाली महिलेची प्रसूती

वेदना असाह्य झाल्यानं रोशनी पायी चालत रुग्णालयात गेल्या. मात्र पुन्हा तेच कारण देत रोशनी यांना घरी पाठवण्यात आलं.

  • Share this:

उल्हासनगर, 26 एप्रिल: उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. लॉकडाऊनमध्ये दोन वेळा प्रसूतीसाठी अडीच किलोमीटर चालत शासकीय रुग्णालयात गेलेल्या महिलेला डॉक्टरांनी दाखल करून घेतलं नाही. अखेर महिलेची प्रसूती घरीच झाल्याची घटना समोर आली आहे. रोशनी शेख असं पीडित महिलेचं नाव आहे. ती दोन वेळा प्रसूतीसाठी रुग्णालयात चालत गेली होती. मात्र प्रसुतीला वेळ असल्याचे कारण देत तिला डॉक्टरांनी दाखल करून न घेता घरी पाठवलं होतं.

हेही वाचा.. तो लढला आणि जिंकलाही! गोव्याला कोरोनामुक्त करणारा पडद्यामागचा हीरो

उल्हासनगरच्या ओटी सेक्शन भागत राहणारी 26 वर्षीय रोशनी शेख गरोदर महिलेला शनिवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने ती अडीच किलोमीटर चालत मध्यवर्ती रुग्णालयात गेली. मात्र, प्रसूती वेळ जवळ आली नाही, असं सांगून तिला घरी पाठवण्यात आलं. दुपारी 2 वाजता रोशनी शेख या महिलेला पुन्हा प्रसूती वेदना सुरु झाल्या. वेदना असाह्य झाल्यानं रोशनी पायी चालत रुग्णालयात गेल्या. मात्र पुन्हा तेच कारण देत रोशनी यांना घरी पाठवण्यात आलं. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाच्या या भूमिकेमुळे सायंकाळी 6 च्या दरम्यान रोशनीची घरीच प्रसूती करण्याची वेळ आली.

हेही वाचा.. CRPF च्या जवानानं स्वत: छातीत झाडली गोळी, सुसाईड नोटमध्ये लिहिलं हे कारण

लॉकडाऊन आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असताना देखील अनेक रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी जीवाचं रान करून आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या या बेजबाबदारपणा मुळे एका महिलेवर घरीच प्रसूती करण्याची वेळ आली.

याप्रकरणी संबंधित स्टाफवर कारवाई करणार असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक सुधाकर शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, घरी प्रसूती करण्याची वेळ आल्यानं रोशनी आणि तिच्या बाळाच्या जीवाला काही धोका होऊ शकला असता, असं तिच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 26, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading