मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रागाच्या भरात तिने पाण्यात मारली उडी, 2 लेकरं गमावली अन् संसाराची झाली राखरांगोळी!

रागाच्या भरात तिने पाण्यात मारली उडी, 2 लेकरं गमावली अन् संसाराची झाली राखरांगोळी!


पहाटे तीनच्या सुमारास अंजलीने आपली दोन्ही मुलं शौर्य आणि दिव्याला सोबत घेतले आणि खाडी गाठली.

पहाटे तीनच्या सुमारास अंजलीने आपली दोन्ही मुलं शौर्य आणि दिव्याला सोबत घेतले आणि खाडी गाठली.

पहाटे तीनच्या सुमारास अंजलीने आपली दोन्ही मुलं शौर्य आणि दिव्याला सोबत घेतले आणि खाडी गाठली.

बारामती, 29 मे :  क्षणिक रागाच्या भरात केलेले कृत्य एखाद्याच्या जिवावर बेतू शकतो याचा प्रत्यय आज बारामतीतील (Baramati) एका दुर्दैवी घटनेमुळे आला. नवरा-बायकोमध्ये झालेल्या भांडणानंतर विवाहितेनं आपल्या दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केला, पण या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकल्यांचा दुदैवी अंत झाला. तर विवाहित महिला वाचली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळी इथं राहणारे अतुल सूर्यवंशी व अंजली सूर्यवंशी या दोघांमध्ये रात्री वादावादी झाली होती. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला होता. परंतु, नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे अंजली हिला प्रचंड राग आला होता. त्यामुळे तिने पहाटे रागाच्या भरात पिंपळी येथील खाडीच्या पाण्यात आत्महत्येचा निर्णय घेतला.

11.8 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, केंद्र सरकारची मोठी घोषणा

पहाटे तीनच्या सुमारास अंजलीने आपल्या दोन्ही मुलं शौर्य आणि दिव्याला सोबत घेतले आणि खाडी गाठली. काही कळायचा आत अंजलीने मुलांसहीत पाण्यात उडी मारली. पण, पाण्यात पडल्यानंतर तिने जिवाच्या आंकाताने आरडाओरडा केला.

त्याचेवळी शेजारीच दुध डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी आवाज ऐकला आणि त्यांनी खाडीकडे धाव घेतली. पाण्यात अंजली आणि दोन्ही मुलं पडलेली पाहिली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता पाण्यात उड्या मारून या तिघांनाही बाहेर काढले.

'मी मूर्ख नाही...' वासिम अक्रमने सांगितलं पाकिस्तानचा कोच न होण्याचं कारण

बाहेर काढल्यानंतर तातडीने तिघांना उपचारासाठी शहरातील सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी या दोन्ही मुलांना मृत घोषित केले. तर या महिलेवर सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. क्षणिक रागाने दोन चिमुकल्यांचा आज दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published: