मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रात चाललंय काय? शशी थरूर यांचा हा नवा शब्द डिक्शनरीमध्येही नाही

महाराष्ट्रात चाललंय काय? शशी थरूर यांचा हा नवा शब्द डिक्शनरीमध्येही नाही

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी राजकारण्यांचं वर्णन करताना एक वेगळाच शब्द वापरलाय. या शब्दाचा अर्थ तुम्हाला डिक्शनरीमध्येही मिळणार नाही.

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी राजकारण्यांचं वर्णन करताना एक वेगळाच शब्द वापरलाय. या शब्दाचा अर्थ तुम्हाला डिक्शनरीमध्येही मिळणार नाही.

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी राजकारण्यांचं वर्णन करताना एक वेगळाच शब्द वापरलाय. या शब्दाचा अर्थ तुम्हाला डिक्शनरीमध्येही मिळणार नाही.

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर राज्यात ज्या घडामोडी घडतायत त्याला काय म्हणावं असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. पण काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी मात्र राजकारण्यांसाठी एक वेगळाच शब्द वापरलाय. त्यांनी त्यांच्या शैलीत भाजपवर टीका केली आहे. सरकार कसं बनलं ? सरकारकडे बहुमत आहे का ? या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आता काढलेला शब्द आहे, snollygoster. या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी डिक्शनरी पाहावी लागणार आहे. पण गंमत म्हणजे त्यांनी काढलेला हा शब्द डिक्शनरीमध्येही मिळत नाहीये.

2017 मध्ये वापरला होता हा शब्द

शशी थरूर यांनी ट्वीटमध्ये लिहिलेला snollygoster हा शब्द पहिल्यांदा 2017 मध्ये वापरला गेला. अमेरिकी डिक्शनरीनुसार या शब्दाचा अर्थ होतो, धूर्त आणि अप्रितिष्ठीत राजकीय नेता. हा शब्द पहिल्यांदा 1845 मध्ये वापरण्यात आला होता.त्यानंतर 26 जुलै 2017 मध्ये काँग्रेसच्या खासदारांनी snollygoster हा शब्द वापरला होता.

नितिशकुमार यांच्यावर टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांना लक्ष्य करताना snollygoster या शब्दाचा वापर झाला. जनता दल युनायटेडचे प्रमुख असलेल्या नितिशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी युती तोडली आणि बऱ्याच काळानंतर ते भाजपमध्ये आले. तेव्हा त्यांच्यावर टीका करताना snollygoster या शब्दाचा वापर झाला होता.आता नितिशकुमार यांच्यासाठी वापरलेला हा शब्द शशी थरूर यांनी कुणासाठी वापरलाय, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते तुम्हीच ठरवा.

==================================================================================

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Shashi tharoor