Home /News /maharashtra /

बार्शीचा 'हर्षद मेहता' विशाल फटेला पोलिसांचा दणका, जप्त होणार कोट्यवधींची मालमत्ता

बार्शीचा 'हर्षद मेहता' विशाल फटेला पोलिसांचा दणका, जप्त होणार कोट्यवधींची मालमत्ता

Vishal Phate Fraud Case: बार्शीचा 'हर्षद मेहता' अशी ओळख झालेल्या विशाल फटेभोवती कारवाईचा फास आवळायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. फटेच्या आलिशान गाडीसह त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांकडून कायदेशीर पावलं टाकली जात आहेत.

पुढे वाचा ...
    सोलापूर, 22 जानेवारी: मागील काही दिवसांपासून विशाल फटेचं प्रकरण (Vishal Phate case) राज्यभर गाजत आहे. शेअर बाजारातून लाखोंची कमाई करून देण्याचं आमिष दाखवून अनेकांना लुटणारा (Share market fraud) विशाल फटे सध्या तुरुंगाची हवा खात आहे. बार्शीचा 'हर्षद मेहता' अशी ओळख झालेल्या विशाल फटेभोवती कारवाईचा फास आवळायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. फटेच्या आलिशान गाडीसह त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांकडून कायदेशीर पावलं टाकली जात आहेत. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम 1999 कलम 3 अंतर्गत फटेची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल. यामुळे फटेच्या मालमत्तेवर लवकरच टाच येणार हे आता स्पष्ट झालं आहे. यासोबतच पोलीस विशाल फटे याचे महागडे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करणार आहेत. यामधून मिळालेली माहिती पुढील तपासासाठी दिशादर्शक ठरू शकते. हेही वाचा-मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्याचा उधळला डाव; अंतर्वस्त्रात लपवले होते 60 हजार डॉलर आरोपी विशाल फटे याने गुंतवणुकदारांच्या पैशांत अनेक ठिकाणी संपत्ती घेऊन ठेवली आहे. यामध्ये 45 लाख रुपयांच्या आलिशान कारसह बार्शीतील 3 कोटींच्या घराचा देखील समावेश आहे. याशिवाय शहरात आणि एकेठिकाणी सहा गुंठे जमीनीवर विशाल फटे नवीन घर बांधत होता. तसेच त्याच्याकडे 250 ते 300 ग्रॅम सोनं आढळलं आहे. ही सर्व मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने पोलिसांकडून पाऊलं उचलली जात आहेत. हेही वाचा-महिलांच्या कपड्यात लपवून ठेवले होते 4 किलो ड्रग्ज, NCB नं केला पर्दाफाश विशाल फटे यानं बार्शीतीलच नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. राज्यभरातून फटेविरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दिपक आंबुरे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर, पोलिसांनी मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी विशाल फटे याच्या भावाला आणि वडिलांना अटक केल्यानंतर विशाल फटेनं पोलिसांत आत्मसमर्पण केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Solapur

    पुढील बातम्या