अजित पवारांच्या पुतण्याची राजकारणात 'एंट्री', आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

अजित पवारांच्या पुतण्याची राजकारणात 'एंट्री', आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

'सरकारमध्ये असताना तुम्ही जुमलेबाजीचं सरकार असं म्हणता आणि दुसरीकडे सत्तेत राहतात'

  • Share this:

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 21 डिसेंबर : 'जर तुम्हाला हे सरकार जुमलेबाजीचं असं वाटत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, सत्ता सोडा आणि मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगा,' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पंढपूरमध्ये पक्षाच्या आणि बैठकीसाठी शिवसेनेच्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आले होते. आदित्य ठाकरेंनी भविष्यात जुमलेबाजी सरकार येऊ नये असं साकडं विठ्ठलाला घातलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी टीका केली.

सरकारमध्ये असताना तुम्ही जुमलेबाजीचं सरकार असं म्हणता आणि दुसरीकडे सत्तेत राहतात. जर तुम्हाला हे सरकार जुमलेबाजीचं असं वाटत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, सत्ता सोडा आणि मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगा, त्यानंतरच तुमच्या वक्तव्याला महत्त्व येईल असा टोला रोहित पवारांनी लगावला.

सध्या आपण कार्यकर्ता म्हणून काम करत असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार आमदार निवडून आणायचे आहेत. तसंच वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक देखील लढवण्यास तयार असल्याचं, सूचक विधानही रोहित पवार यांनी केलं.

पक्ष 15 वर्षे सत्तेत राहिल्यानं पक्षांतर्गत गटबाजी वाढली आहे. भविष्याच्या दृष्टीने विचार करून संघटना स्ट्रॉंग व्हायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार हे सध्या पक्ष संघटनेत चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसत आहे. पुणे तसंच इतर जिल्ह्यामध्ये देखील ते पक्षाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे आगामी काळात रोहित पवारराजकारणात सक्रिय होतात के हे पाहण्याचं ठरणार आहे.

========================

First published: December 21, 2018, 6:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading