• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • काँग्रेसच्या स्वबळाच्या नारेबाजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसच्या स्वबळाच्या नारेबाजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो...'

  • Share this:
बारामती, 27 जून: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्या वादाला सुरुवात करून दिली होती. पण, आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही, हे स्पष्ट केलं. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर पहिल्यांदाच भाष्य केलं. सरकारी टेंडर आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक, गँगचा पर्दाफाश 'आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार असून याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही' असं पवार म्हणाले. 'सरकार 5 वर्ष पूर्ण चालणार' 'महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्यावेळी कॉमन मिनीमम कार्यक्रम तयार करण्यात आला होता. सरकार चालवत असताना काही ना काही अडचणी येत असतात. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे समन्वय साधण्याचं काम करतात. सरकारमध्ये काही अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय हे सहा जण घेत असतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही' असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं. मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर चमकला, वेस्ट इंडिजनं केली दक्षिण आफ्रिकेची धुलाई आरबीआयने नवीन आदेश दिले असून आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आता सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळणार नाही, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, 'RBI ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. त्यामुळे  धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल.'
Published by:sachin Salve
First published: