राऊत-फडणवीसांच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राऊत-फडणवीसांच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून उडालेल्या राजकीय धुराळ्यावर आपले परखड मत नोंदवले आहे.

  • Share this:

पंढरपूर, 29 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. अखेर या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याचबरोबर, शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यताही फेटाळून लावली आहे.

पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून उडालेल्या राजकीय धुराळ्यावर आपले परखड मत नोंदवले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतली. राजकारणात या भेटीगाठी येतच असता. ते भाजपच्या नेत्याची भेट घेणार हे माहिती होते. त्यामुळे त्यांच्या भेटीचा  राजकीय अर्थ काढायचे कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

अरे देवा! कोरोनानंतर आता भारतावर आणखी एका चीनी व्हायरसचं संकट; ICMR ने केलं सावध

'राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. ' असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकाचे खंडन केले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. सरकाराला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे टिकेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पोलीस अधिकाऱ्याने आधी प्रेयसीवर झाडली गोळी, नंतर सासऱ्याची केली हत्या

तसंच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कुणी ही गंभीरपणे घेत नाही. राज्यसभेत ही आणि बाहेर सुद्धा त्यांनी कुणी ही गांभीर्याने घेत नाही.  त्यांचा पक्षाचा एक सुद्धा आमदार नाही आणि खासदार सुद्धा नाही, असं म्हणत शरद पवारांनी आठवले यांना टोला लगावला आहे.

'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या  संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे', असंही पवार म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: September 29, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या