धनंजय मुंडेंची बलात्काराच्या आरोपातून सुटका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंची बलात्काराच्या आरोपातून सुटका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेने आपली तक्रार मागे घेतली अशी बातमी वाचण्यात आली आहे. पण आम्ही...'

  • Share this:

कोल्हापूर, 22 जानेवारी : बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेने आपली तक्रार मागे घेतली अशी बातमी वाचण्यात आली आहे. पण आम्ही या प्रकरणावर चर्चा केल्यावर आम्हाला वाटलं होतं, की सत्यता पडताळली पाहिजेत. सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय आपण कारवाई करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली होती. हे प्रकरण गंभीर होते. परंतु, ज्यावेळी कागदपत्रातून आमच्यासमोर माहिती आली, त्यामुळे खोलात जाऊन चौकशी करण्याचा निष्कर्ष आम्ही काढला आणि आमचा हा निर्णय योग्य राहिला, असं शरद पवार यांनी सांगितले.

रेणू शर्माने लेखी प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार घेतली मागे

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.  एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.  15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.

कोण आहे रेणू शर्मा?

महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता.

Published by: sachin Salve
First published: January 22, 2021, 9:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या