मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ANALYSIS : शरद पवारांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीला मिळणार का 'संजीवनी'?

ANALYSIS : शरद पवारांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीला मिळणार का 'संजीवनी'?

पवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा उडी घेतल्यानें राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही हा प्रश्न असला तरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी या गुरू-शिष्याची भेट लोकसभेत होणार हे नक्की आहे!

पवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा उडी घेतल्यानें राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही हा प्रश्न असला तरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी या गुरू-शिष्याची भेट लोकसभेत होणार हे नक्की आहे!

पवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा उडी घेतल्यानें राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही हा प्रश्न असला तरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी या गुरू-शिष्याची भेट लोकसभेत होणार हे नक्की आहे!

मुंबई 13 फेब्रुवारी : लोकसभेच्या 2019 च्या आखाड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातल्या 'चाणक्य नीती'साठी ओळखले जाणारे शरद पवार उतरणार आहेत. पवारांनी आपली प्रतिज्ञा मोडून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात कार्यकर्त्यांच्या 'आग्रहा'खातर उडी घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणातली रंगत आणखी वाढणार आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला किती फायदा मिळणार याची चर्चा आता सुरू झालीय. राज्यात राष्ट्रवादीला'संजिवनी' मिळणार का असाही प्रश्न विचारला जातोय. 2014 च्या निवडणुकीआधी शरद पवारांनी यापुढे निवडणुक लढणार नाही. नव्या दमाच्या लोकांना संधी देणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर पवारांनी ज्येष्ठांच्या म्हणजेच राज्यसभेत जाणं पसंत केलं. पण गेल्या पाच वर्षात भीमा आणि मुठेतून बरच पाणी वाहून गेल्याने राजकीय समिकरणही बदलली आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी बारामती हा आपला परंपरागत गढ सुप्रीया सुळेंसाठी सोडून माढातून निवडणूक लढवली. माढा हा राष्ट्रवादीचा गढ. माढात सोलापूर जिल्ह्यातले 4 आणि सातारा जिल्ह्यातले 2 मतदारसंघ येतात. महाराष्ट्रात मंत्री असताना पवार सोलापूर जिल्ह्याचे 10 वर्ष संपर्कमंत्री होते त्यामुळे पवारांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. करमाळा, माढा, सांगलो,माळशीरस,फलटण आणि माण हे सहा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदार संघात येतात. सोलापूरचे  दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे असले तरी ते शरद पवारांना गुरू मानतात. त्यांनी शरद पवारांशी असलेलं आपलं नातं कधीही लपवलेलं नाही. तर सातारा जिल्ह्यात निंबाळकर, फलटणकर आणि भोसले ही सर्वच घराणी पवारांना मानणारी आहेत. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिती पाटील हे सध्या माढाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याविषयी वाद असल्याने तिथे कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच राष्ट्रवादीपुढे होता. प्रभाकर देशमुख माजी सनदी अधिकारी आणि पवारांचे विश्वासू. माढ्यातून त्यांना उमेदवारी मिळेल अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र शरद पवार उभे राहणार असल्याने राष्ट्रवादीतला हा वाद मिटणार आपसुकच मिटणार आहे. शरद पवार लोकसभेसाठी माढ्यातून उभे राहिले तर त्याचा सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि सातारा या जिल्ह्यात राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पैकी सोलापूर हा काँग्रेसच्या वाट्याला आहे तिथून सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार असतील. साताऱ्यातून राष्ट्रवादीकडून  उदयनराजे तर उस्मानाबाद शिवसेनेकडे आहे. तिथे फार परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मढ्याच्या जागेशिवाय इतर ठिकाणी फार फायदा होणार नाही असंही काही जणांच मत आहे. 2019 मध्ये 2014 सारखं वातावरण नाही याची कल्पना शरद पवारांना आली आहे. कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने गरज पडली तर पंतप्रधानपदासाठीही त्यांचं नाव पुढे येवू शकते. राजकारणात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर ही मंडळी पुरेसे खासदार नसतानाही पंतप्रधान झाली. त्यामुळे राजकारणात केव्हा काहीही घडू शकते याची पवारांना जणीव आहे. त्यामुळे लोकसभेत राहणं हे केव्हाही चांगलं असं पवारांना वाटत असावं असा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलाय. Special Report : युती झाली तर मोठ्या भावाच मान कुणाला मिळणार?
First published:

Tags: Sharad pawar, माढा, राष्ट्रवादी, शरद पवार

पुढील बातम्या