बारामती, 10 ऑगस्ट : शिंदे गटात बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. आता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हावरही शिंदे गट दावा करणार आहे. पण, 'धनुष्यबाण हे शिवसेनेचे (shivsena dhanush baan) चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला वेगळं चिन्ह घेतलं आम्ही भांडत बसलो नाही, असा सल्लावजा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशामध्ये व राज्यांमध्ये घडत असलेल्या घडामोडी संदर्भात आज बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला.
'धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वढवणे योग्य नाही. जर अशी भूमिका घेतली तर लोक हे स्वीकारणार नाही, असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला.
(100 मुलींच्या शिक्षणासाठी ‘त्या’ दोघी करणार लडाखमधली अस्पर्शित शिखरं पादाक्रांत)
'भाजपच्या अध्यक्षांनी असं वक्तव्य केलं की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत. आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल. नितीश कुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो. सेना भाजप एकत्र होते. सेनेत दुरी कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि सेनेवर आघात केला. नितीशकुमार हे लोकांमधील मान्यता असलेला नेता आहे. निवडणुकीत भाजप एकत्र येतात आणि मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घेतात. नितीशकुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. परंतु नितीशकुमारांनी टाकलेल पाऊल शहाणपणाचे आहे, असंही पवार म्हणाले.
'श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झाला. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षतली आहे. बांगलादेश मध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उदभवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे.सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असंही पवार म्हणाले.
(कोरोनानंतर आता चीनमध्ये आढळला नवा लँग्या व्हायरस; 35 जणांना लागण)
संसद चालवण्याची आस्था केंद्र सरकारमध्ये आहे गेल्याकाही वर्षात आहे असं वाटतं नाही. चर्चेचा मार्ग बंद करतात, अशी टीकाही पवारांनी केली.
देशभरामध्ये प्रत्येक घरामध्ये तिरंगा ध्वज फडकवण्याची मोहिम राबवली जात आहे. राष्ट्रीय कमिटी आहे, त्याचा सदस्य आहे. त्यात ही चर्चा झाली. हा पक्षीय कार्यक्रम नाही. यात आम्हा सगळयांची त्यांना साथ आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
यावेळी शरद पवार यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय राठोड यांना संधी देण्यात आली, यावर बोलण्याचे टाळलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.