साखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र

साखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर आणि ऊसाच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिसाद देत एक समिती नेमलीय, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

  • Share this:

कोल्हापूर, 23 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर आणि ऊसाच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिसाद देत एक समिती नेमलीय, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. नितीन गडकरी या समितीचे अध्यक्ष आहेत, तर या समितीत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि रामविलास पासवान यांचाही समावेश आहे.

देशातला साखर उद्योग अडचणीत सापडलाय त्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये एक बैठक होणार असून या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवानही उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीच्या अनुषंगाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गडकरी यांना काही सूचना केल्याचं कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितलंय.

यामध्ये देशातील 60 टक्के साखर ही पेय आणि मिठाई तयार करणाऱ्या कंपन्या वापरतात त्यांच्यावर सेस बसवावा, इंधन दरवाढ झाली असतानाही इथेनॉल दर वाढलेले नाहीत, त्यामुळं इथेनॉलचे दर वाढवावेत, केंद्र सरकारन  साखरेची निर्यात वाढवावी , बफर स्टॉकची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी अशा सूचना गडकरींना केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

First published: April 23, 2018, 11:53 AM IST

ताज्या बातम्या