शरद पवार संतापले, 'त्या' अफवा फेटाळण्यासाठी लिहिली फेसबुक पोस्ट

शरद पवार संतापले, 'त्या' अफवा फेटाळण्यासाठी लिहिली फेसबुक पोस्ट

शरद पवार यांनी फेसबुकवरून खुलासा करत संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत होता. याबाबत आता स्वत: शरद पवार यांनी फेसबुकवरून खुलासा करत संताप व्यक्त केला आहे.

'राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअॅप सोशल माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले. काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो,' असं शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सायबर यंत्रणेने तात्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत आता पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.

दरम्यान, सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अफवांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच निवडणूक काळात या अफवांचा बाजार होताना दिसतो. त्यामुळे सर्वसामान्यांची दिशाभूल तर होतेच पण संबंधित व्यक्तीलाही मनस्तापाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा अफवा पसरू नयेत, यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.

VIDEO: राज्यात 24 जिह्यांवर दुष्काळाचं संकट, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: July 25, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading