Home /News /maharashtra /

भारताचे पुढचे पंतप्रधान शरद पवार होणार, वाचा कुणी केलं भाकीत?

भारताचे पुढचे पंतप्रधान शरद पवार होणार, वाचा कुणी केलं भाकीत?

महाविकास आघाडीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्य शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलंय.

    औरंगाबाद, 04 फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव कधी राष्ट्रपतीपदासाठी तर कधी पंतप्रधानपदासाठी कायम चर्चेत असतं. शरद पवार राष्ट्रपती होतील असा विश्वास नुकताच संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. आता पवारांच्या नातवानं त्याचं नाव पंतप्रधानपदासाठी पुन्हा चर्चेत आणलंय. महाविकास आघाडीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्य शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलंय. औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांचा लढावूपणा उभ्या देशानं पाहिला. आपलं अजून वय झालेलं नसून आपण आजही मैदानात आहोत असं मांडी थोपटून पवार आपल्या विरोधकांना आव्हान देत असतात. तोच धागा पकडत राहित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल हे वक्तव्य केलंय. “साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखीच महाविकास आघाडी देशातही झाली तर आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हेही वाचा - काँग्रेसला झटका! बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये; वडील म्हणतात 'मला माहीत नाही' शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब  जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.”असंही रोहित पवार म्हणाले. मुनगंटीवारांना टोला “भाजपचे नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करताहेत. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळणार नाही. त्यांनी उगाच खोट्या आशेवर राहू नये. असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांना रोहित पवारांनी खोचक टोला लगावलाय. सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीबद्दल अनेकदा वक्तव्य करत शिवसेनेला कुरवाळण्याचा प्रयत्न केला होता.त्याचा रोहित पवारांनी समाचार घेतला.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Prime minister, Rohit pawar, Sharad pawar

    पुढील बातम्या