पवारसाहेब Vs विखे पाटील.. नगर आणि शिर्डीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष

पवारसाहेब Vs विखे पाटील.. नगर आणि शिर्डीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील निकालाकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रात सर्वाधीक चर्चा याच जागेची आहे. कारणही तसेच आहे. या लढतीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारविरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील, असे पाहिले जात आहे.

  • Share this:

नगर, 22 मे- अहमदनगर लोकसभा मतदार संघातील निकालाकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रात सर्वाधीक चर्चा याच जागेची आहे. कारणही तसेच आहे. या लढतीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारविरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील, असे पाहिले जात आहे.

अहमदनगर एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये नगर आणि शिर्डी मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. 2019 मतदान केंद्र असलेल्या या मतदार संघाची मतमोजणी 84 टेबल्सवर होणार आहे. 24 फेऱ्यात मतमोजणी होईल, दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे. या निकालावर माजी विरोधीपक्ष नेते यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. नगर मतदारसंघातून भाजपचे डॉ.सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप तर शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आणि शिवसेनेकडून सदाशिवराव लोखंडे हे उमेदवार आहेत.

सुजय विखे पाटील VS संग्राम जगताप, विजय कुणाचा?

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा प्रचंड गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजिव डॉ. सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने लागलीच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.

आघाडीला धक्का

विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच भाजपमध्ये आल्याने भाजपने आघाडीला जोरदार धक्का दिला. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी अजून काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही.

काँग्रेसकडून भाजपकडे

नगरची ही जागा अनेक वर्षे काँग्रेसचा गड मानला जातो. काँग्रेसने येथूनच ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली त्या सगळ्यांचा विजय झाला. या जागेवर काँग्रेसने तब्बल 46 वर्षे राज्य केले. 1998 मध्ये मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील शिवसेनेत गेल्यामुळे ही जागा शिवसेनेच्या पदरात पडली. त्यानंतर 1999 मध्ये भाजपचे दिलीप गांधी इथून विजयी झाले. 2004 मध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पुन्हा 2009 आणि 2014 मध्ये नगरची जागा भाजपकडे आली.

भाजपचा तीनदा विजय

शिवसेनेत असलेले बाळासाहेब विखे पाटील एनडीए सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. 2004 मध्ये मात्र बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये परत आले. भाजप शिवसेना युतीतर्फे ही जागा भाजप लढवत आला आहे आणि तीनदा इथे भाजपचा विजयही झाला आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून संग्राम जगताप रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टीनेही आपले उमेदवार उतरवले आहेत.

नगरची जागा भाजप राखणार का ?

2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांना 6 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. राष्ट्रवादीचे राजीव राजाळेंना 3 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. दिलीप गांधींचा त्यावेळी दणदणीत विजय झाला. त्यामुळेच नगरची जागा भाजप राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात शेगाव, राहुरी, कर्जत जामखेड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पारनेर शिवसेनेकडे आहे तर अहमदनगर शहर आणि श्रीगोंदा या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

First published: May 22, 2019, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading