नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, पिकांची केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, पिकांची केली पाहणी

पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत.

शरद पवार हे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर भागातीलही जिथं पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तिथला दौरा करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी नाशिकमधून केली. इगतपुरी मधील भात पिकाच्या नुकसानीची पहाणी शरद पवारांकडून करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार ही उपस्थित होते.

'परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली. पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं या शेतकऱ्यांनी सांगितलं,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत. एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First published: November 1, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading