मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवारांनी PM पदाचं उमेदवार व्हावं, काँग्रेसनं आतापासून सुरू केली तयारी

शरद पवारांनी PM पदाचं उमेदवार व्हावं, काँग्रेसनं आतापासून सुरू केली तयारी

 शरद पवार यांच्या नेतृत्त्वात देशात विरोधी पक्षांशी आपली मोट बांधावी, अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात देशात विरोधी पक्षांशी आपली मोट बांधावी, अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात देशात विरोधी पक्षांशी आपली मोट बांधावी, अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडीनं वर्षपूर्ती सोहळा दिमाखात साजराही केला आहे. महाविकास आघाडी सरकार 5 नाही 25 वर्षे सत्तेत राहणार, असा मानस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वात देशात विरोधी पक्षांशी आपली मोट बांधावी, अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली आहे.

विशेष विरोधी पक्षांतील नेते अमेरिकेतील जो बायडन थेरपी भारतात लागू करण्याची तयारी करत आहेत. म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा...UPAच्या अध्यक्षपदी पवारांच्या नावाची चर्चा, सोनिया होणार रिटायर?

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून खलबंत सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांकडून समजते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी येत्या काळात सेवानिवृत्त होणार असून त्या पदाची सगळी सूत्रे शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या चर्चेनं देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

'TV9 मराठी'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी राष्ट्रीय पातळीवर करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं शरद पवार यांनी नेतृत्त्व करावं, असं काँग्रेसनं प्रस्तावात म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसनं केली असल्याचं समजतं.

तसं पाहिलं तर देशात पुढील लोकसभा निवडणुकीसाठी अजून साडेतीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आता लोकसभा निवडणुका 2023 मध्ये होतील. मात्र, आतापासून काँग्रेसनं यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीएकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं होतं. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदीविरुद्ध राहुल गांधी यांचा टिकाव लागला नाही. 2014 प्रमाणे 2019 मध्येही काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नंतर पक्षांतर्गत वाढत्या दबाबामुळे राहुल गांधी यांना अध्यक्षपदाचाही त्याग करावा लागला होता.

हेही वाचा...भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा थोडक्यात बचावले, तृणमूल कार्यकर्त्यांकडून हल्ला

ऐनवेळी शरद पवारांनी घेतली होती माघार...

शरद पवार हे माढा मतदारसंघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत  रिंगणात उतरणार होते. मात्र, त्याचवेळी अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिलं तर चुकीचा संदेश जाईल. कार्यकर्ते नाराज होतील, असे मत व्यक्त करत शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली होती.

First published:

Tags: Congress, Maharashtra, NCP, Pm modi, Sharad pawar, Sonia gandhi