'निर्मला सीतारामन यांना देशाच्या सभ्यतेची, प्रतिष्ठेची जाण आहे का?' पवारांनी डागली तोफ

'अर्थमंत्र्यांनी परदेशात जाऊन आपल्या देशाबद्दल टीकाटिप्पणी केली. देशाची काही सभ्यता, प्रतिष्ठा, पथ्य याची जाण या लोकांना आहे की नाही?' अशा शब्दांत शरद पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर जाहीरपणे खरमरीत टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 07:04 PM IST

'निर्मला सीतारामन यांना देशाच्या सभ्यतेची, प्रतिष्ठेची जाण आहे का?' पवारांनी डागली तोफ

पिंपळगाव (नाशिक), 17 ऑक्टोबर : आपल्या देशाची बदनामी आणि बेइज्जती मोदींच्या राजवटीतच होत आहे. म्हणून आपल्याला परिवर्तन करावं लागेल, अशा शब्दांत मोदी सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्या विधानाचाही समाचार घेतला. "देशाच्या अर्थमंत्री Nirmala sitaraman अमेरिकेत जाऊन म्हणाल्या की, देशाचे वाटोळे माजी पंतप्रधान व गव्हर्नर यांनी केले. या दोघांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली. अमेरिकेत जाऊन आपल्या देशाबद्दल अशी टीकाटिप्पणी करतात, देशाची काही सभ्यता,प्रतिष्ठा,पथ्य याची जाण या लोकांना आहे की नाही?" असा जाहीर सवाल शरद पवार यांंनी केला.

Loading...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार पिंपळगाव इथे सभा घेतली. त्या वेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि त्यांच्या आर्थिक धोरणावर सडकून टीका केली. निफाड मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारानिमित्त पवार यांनी सभा घेतली.

वाचा - आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यास तयार, नितेश राणेंनी पुढे केला मैत्रीचा हात

पवार म्हणाले, "देशाचे पंतप्रधान देशाच्या बाहेर जातात आणि देशाची भूमिका मांडतात. या पदाची प्रतिष्ठा आणि मान राखला पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते ही प्रतिष्ठा ठेवताना दिसत नाहीत" , असं सांगून निर्मला सीतारामन यांच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेतला.

वाचा - 'भारतरत्न' म्हणजे हे सरकारचं इलेक्शन गिमिक,सुप्रिया सुळेंची सरकारवर घणाघाती टीका

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्यामुळे देश आर्थिक संकटात आला, असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं होतं.

देशाची अर्थव्यवस्था मोदी यांच्या काळातच बिघडत चालली आहे, असं नमूद करताना पवार म्हणाले, "हंगर इंडेक्सनुसार भारतातील मुलांना योग्य, पोषक अन्न मिळत नाही. आपल्यापेक्षा नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान येथील मुलांना जास्त अन्न मिळतं. जो अन्नधान्य निर्यात करतो त्या देशात मुलांना खायला अन्न नाही, ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते."

----------------------------------

VIDEO : सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि बलिदान देणारे कुटुंब देशात नाही - अमित शहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...