Home /News /maharashtra /

मोदी-शहांना रोखण्यासाठी शरद पवारांनी सुचवला 'नवा पॅटर्न'!

मोदी-शहांना रोखण्यासाठी शरद पवारांनी सुचवला 'नवा पॅटर्न'!

'आज लोकं एक पर्याय शोधत आहे तो पर्याय कुठला तरी एक पक्ष देईल, अशी अवस्था देशात नाही'

      साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर,02 जानेवारी : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे. राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला सत्तेतून खाली खेचलं आहे.  लोकं आता नवा पर्याय शोधत आहे. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. 'एक पक्ष पर्याय देऊ शकेल अशी अवस्था नाही' राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.  देशातील आताची परिस्थिती पाहिली तर कुठलाही एक पक्ष पर्याय देऊ शकेल अशी अवस्था नाही. त्यामुळे इतर राज्यातही असं वातावरण आहे. आज लोकं एक पर्याय शोधताय तो पर्याय कुठला तरी एक पक्ष देईल, अशी अवस्था देशात मुळीच नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असा एक विश्वास जानकारांच्या मनामध्ये आहे आणि त्यादृष्टीने लोक महाराष्ट्राकडे बघत आहे. बघुया, काय होतंय, असं म्हणत शरद पवारांनी नव्या रणनीतीचे संकेत दिले आहे. तसंच,  देशात महाराष्ट्राचा राजकीय पॅटर्न वापरतात की नाही हे माहीत नाही. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात काय घडलं आणि शरद पवार यांनी जे काही केलं आहे त्यातून आम्ही प्रेरणा घेतली आहे. असाच विचार सगळ्यांनी करायचं ठरवलंय. कालच मला ममता बॅनर्जी यांचं पत्र भेटलं आहे त्यांनी इतर पक्षाबरोबर बैठक बोलावली आहे, अशी माहितीही पवारांनी दिली. 'खातेवाटपावरून कुणीही नाराज नाही' खातेवाटपावर विलंब का होतोय, याबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे.  महाराष्ट्रात खाते वाटपावरून कुठल्याही पक्षात पक्षात नाराजी नाही. खातेवाटपाचा विषय आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेला असून त्या पक्षाने कुणाला कुठलं काम करायचं हे ठरवायला हवं याचाही निर्णय आज किंवा उद्या होईल. राष्ट्रवादीमध्ये कुठलाही वाद नाही उलट आम्ही खाते घ्या म्हणतोय आणि मंत्री नको म्हणताय, अशी अवस्था सध्या राष्ट्रवादीत आहे, असं पवारांनी सांगितलं. तसंच, सरकारमध्ये मध्ये खात्यांचा घोळ अजिबात नाही. खात्याचे सगळे निर्णय झाले आहेत कुठलं खातो घ्यायचं हे पण ठरलेलं आहे. उद्या मुख्यमंत्री याबद्दल निर्णय जाहीर करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'नव्या पिढीला कामही जास्त देणार' मी अनेकदा मंत्री होतो. खातेवाटप झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळायचं की, आम्हाला काय काम करायचंय हे एका पक्षाचं असताना असं व्हायचं. यावेळेस मात्र तीन पक्ष आहेत. सुदैवानं यावेळेस आठ दिवसापूर्वी ठरलेलं आहे. ती कुठल्या पक्षाला कुठली खाती द्यायची आता त्या पक्षांनी ठरवायचं आहे की कुठल्या मंत्राला कुठलं खातं द्यायचं. आम्ही यावेळेस नवीन पिढीला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि नव्या पिढीला कामही जास्त देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. डी.पी. त्रिपाठींच्या आठवणींना दिला उजाळा डी.पी. त्रिपाठी हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे सदस्य होते.  हिंदी मधला अत्यंत विद्वान उत्तम लेखक आणि विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक होता. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्या काळात त्यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं सहकारी म्हणून काम करत असताना शासकीय काम बरोबर ते इतर देशांच्या कामावर सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातील महत्त्वाच्या देशांशी राजीव गांधींचे मेसेंजर म्हणून संपर्क साधण्याचे काम ते करत होते. पाकिस्तानचे प्रधानमंत्री असो आजूबाजूच्या सर्व देशांचे पंतप्रधान किंवा मंत्री असो या सर्व देशांच्या मंत्र्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध असायचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून महत्त्वांच्या भूमिकांवर पार्श्वभूमी तयार करायचं काम ते करत होते. सहा महिन्यांपासून ते आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये होते. गेल्या आठवड्यात त्यांचा मला निरोप आला होता. महाराष्ट्रात सत्ता बदल झालाय या संदर्भात त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. त्यांनी महाराष्ट्राचा पॅटर्न आपण आणि राज्यांमध्ये करू शकतो का या यासंबंधी माझ्याशी सविस्तर चर्चा करायची होती. त्यावेळी मी त्यांना तब्येतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही.  ते अत्यंत सुस्वभावी होते. गाडा अभ्यासक आणि भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं, अशी भावना पवारांनी व्यक्त केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ahamadnagar, Amit Shah, BJP, Narendra modi, NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या