शरद पवारांच्या विधानामुळे गोंधळात वाढ, काँग्रेससोबत बैठकीवर दिलं धक्कादायक उत्तर

शरद पवारांच्या विधानामुळे गोंधळात वाढ, काँग्रेससोबत बैठकीवर दिलं धक्कादायक उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेससोबत मिटिंग आहे का असा प्रश्न विचारताच धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं. यावरून सेना-भाजपनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीतही बिनसल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर त्यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला आणि अखेर भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यात ऐतिहासिक महाआघाडी होणार अशी चर्चा होती. पण त्यातही शिवसेनेला अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचं पत्र मिळालं नाही. आता हेच पत्र काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आरोप प्रत्यारोपाचं काऱण बनलं आहे. अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आम्ही पत्राची वाट बघत होतो पण काँग्रेसकडून त्यासाठी उशिर झाला. शेवटी पत्र मिळालं नाही आणि एकट्या राष्ट्रवादीला सरकार स्थापन करणं शक्य नाही. काँग्रेस सोबत असेल तरच काहीतर करता येईल असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीबद्दल विचारले असता त्यांनी धक्कादायक असं विधान केलं. शरद पवार म्हणाले की, कोण म्हणलं आमची बैठक आहे? मला तरी माहिती नाही. शरद पवारांच्या या विधानामुळे काँग्रेस राष्ट्रवादीतही आता बिनसलं की काय अशी चर्चा रंगली आहे.

दिल्लीत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रद्द झाली आहे. या बैठकीला राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित राहणार होते. पवारांची सेनेशी चर्चा झाली नाही त्यामुळे सोनिया गांधींकडून असा निर्णय घेतला गेल्याचं म्हटलं जात आहे. यातच अजित पवार यांनीही पत्र मिळण्यास काँग्रेसमुळे उशिर झाला असं म्हटलं.

वाचा : एका फोन कॉलमुळे शिवसेना सत्तेपासून राहिली लांब

राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत वेळ दिला आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंसोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी सेनेचा पाठिंबा घेऊन काँग्रेससोबत सरकार स्थापनेच्या हालचाली करणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

सत्तानाट्य! भाजप-सेनेला जमलं नाही ते राष्ट्रवादी करून दाखवणार

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

Published by: Suraj Yadav
First published: November 12, 2019, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading