• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बुलेट ट्रेन मुंबईहून चंद्रपूरला का नेली नाही?-शरद पवार

बुलेट ट्रेन मुंबईहून चंद्रपूरला का नेली नाही?-शरद पवार

बुलेट ट्रेन अहमदाबादला नेण्याऐवजी चंद्रपूरला का नेली नाही असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय. अहमदनगरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरही टीका केलीये. कर्जमाफीतला संपूर्ण कर्जमाफी शब्द गायब झाल्याचं पवारांनी म्हटलंय.

  • Share this:
अहमदनगर, 24 सप्टेंबर : बुलेट ट्रेन अहमदाबादला नेण्याऐवजी चंद्रपूरला का नेली नाही असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय. अहमदनगरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरही टीका केलीये. कर्जमाफीतला संपूर्ण कर्जमाफी शब्द गायब झाल्याचं पवारांनी म्हटलंय. पवार म्हणाले, 'पेट्रोल गॅसची दरवाढ झाली ते करण्याची गरज नव्हती. यामुळे सामान्य जनतेला त्रास झाला. भारत सरकारने दरवाढीबाबत घेतलेला निर्णय परत मागे घ्यावा.' बुलेट ट्रेनबद्दल बोलताना ते म्हणाले, 'मुंबई - अहमदाबाद ट्रेनमध्ये ११ स्टेशन्स आहेत. त्यात फक्त ४ स्टेशन्स महाराष्ट्रातली आहेत. यामध्ये  गुजरातला फायदा आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे.यामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. जर महाराष्ट्राला अावश्यकता असती तर मुंबई चंद्रपूर केली असती. दिल्लीपर्यंत नेली असती तर अनेक राज्यांना लाभ झाला असता. त्यामुळे बुलेट ट्रेनचा निर्णय दुर्दैवी आहे. पवारांनी शेतकरी कर्जमाफीबद्दलही सरकारवर टीकेची झोड उठवलीय. ते म्हणाले, 'राज्य सरकार संपूर्ण कर्जमाफी करणार याचे स्वागत केले. मात्र आता संपूर्ण हा शब्द गायब झालाय. कर्जबाजारीमध्ये जिरायत शेतकरी आहे. त्याच्यामध्ये दीड लाख भरण्याची कुवत असती तर कर्ज थकवलं नसतं.' शिवसेनेच्या भूमिकेचे त्यांनी अभिनंदन केले,  परंतु सत्तेत राहून शिवसेना रस्त्यावर उतरू शकत नाही,  विरोध करायचा असेल तर आमच्यासारखे रस्त्यावर उतरा, असंही त्यांनी ठणकावलं.
First published: