भाजपचे निर्णय हल्ली कोल्हापुरातून होतात - शरद पवार

भाजपचे निर्णय हल्ली कोल्हापुरातून होतात - शरद पवार

राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. यावरही पवारांनी जोरदार टोला हाणला. मंत्री कोण असणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, पण आता हे निर्णय कोल्हापुरातून होतायेत, अशी कोटी त्यांनी केली.

  • Share this:

कोल्हापूर,20 आॅगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ५० वर्षं भाजपचं सरकार राहील असं अमित शहा म्हणतात. पंचाग घेऊन भविष्य सांगायचा व्यवसाय त्यांनी कधी सुरु केला मला माहीत नाही, असं पवार म्हणाले.

राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. यावरही पवारांनी जोरदार टोला हाणला. मंत्री कोण असणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, पण आता हे निर्णय कोल्हापुरातून होतायेत, अशी कोटी त्यांनी केली.

शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांनाही टोला हाणला. ते म्हणाले, राजू शेट्टींचे कार्य माहीत आहे पण दुसरे कोण मला  माहीत नाही.

शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पवारांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 04:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading