पतंगराव कदमांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक जीवनाची हानी - शरद पवार

पतंगराव कदमांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक जीवनाची हानी - शरद पवार

तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रातही पतंगराव कदमांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर त्यांनी विधीमंडळातही आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या.

  • Share this:

10 मार्च : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्यामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

'पतंगराव जवळपास ५० वर्ष सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारती विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास आज ४ लाखाच्यावर विदयार्थी शिक्षण घेत आहेत.' असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या यशस्वी कार्यकीर्दीला उजाळा दिला आहे.

तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रातही पतंगराव कदमांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर त्यांनी विधीमंडळातही आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. शासनामध्ये प्रभावशाली मंत्री म्हणून आपल्या कामांचा ठसा उमटवला होता. असंही पवार म्हणाले.

पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरुन निघणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आणि व्यक्तीगत स्वरुपात मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त करतो. अशा शब्दात शरद पवार यांनी पतंगराव कदम यांना क्षद्धांजली वाहिली आणि त्यांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला.

First published: March 10, 2018, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading