पवारांचा मोदींवर पलटवार; 'पंतप्रधानपदावरील व्यक्तीने असं बोलावं का?'

पवारांचा मोदींवर पलटवार; 'पंतप्रधानपदावरील व्यक्तीने असं बोलावं का?'

PM नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

  • Share this:

अहमदनगर, 22 सप्टेंबर: दहशतवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान देश शरद पवारां(Sharad Pawar)ना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी नाशिक येथील सभेत टीका केली होती. PM मोदींच्या या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिले आहे. एखादी गोष्ट बोलताना त्याची सत्यता तपासून पाहिली पाहिजे. संबंधित गोष्टीची सत्यता तपासून न पाहता वक्तव्य करणे हे पंतप्रधानपदाला शोभत नाही, अशा शब्दात पवारांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले. ते अहमदनगर येथील एका प्रचार सभेत बोलत होते.

नाशिक येथे भाजपच्या महाजनादेश यात्राच्या समारोप सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, असे मोदी म्हणाले होते. मोदींनी केलेल्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्याला उत्तर दिले होते. पण पवारांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले नव्हते.

पवारांनी दिले स्पष्टीकरण...

नगरमध्ये झालेल्या सभेत बोलताना पवारांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, एखाद्या गोष्टीची सत्यता न तपासता वक्तव्य करणे पंतप्रधानपदावरील व्यक्तीला शोभत नाही. पाकिस्तान संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, भारताविरुद्ध बोलने हेच पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्करते धोरण आहे. या धोरणामुळे पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांचे हित साधत नाही पण त्या देशातील सत्ताधाऱ्यांचे हित साध्य होते. मी केलेले वक्तव्य असे होते. माझ्या या वाक्यामुळे पाकिस्तानला कशा प्रकारे मदत झाली? एका पंतप्रधानपदावरील व्यक्तीने अशा प्रकारे वक्तव्य करावे का?, असा सवाल त्यांनी विचारला.

असा हा निवडणूक कार्यक्रम...

अधिसूचना - 27 सप्टेंबर.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 07:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading