कुटुंबात फूट पडल्याचं सुप्रिया सुळेंनी केलं मान्य, काय म्हणाले शरद पवार

कुटुंबात फूट पडल्याचं सुप्रिया सुळेंनी केलं मान्य, काय म्हणाले शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या धक्कादायक घडामोडींनंतर सुप्रिया सुळे यांनी त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर राजकीय आणि कौटुंबीक फूट अशाप्रकारचं स्टेटस अपडेट केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : राजकीय वर्तुळात झालेल्या भूकंपानं अख्खा महाराष्ट्र हादरला. सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीकडून सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळे ठरत असताना मात्र अचानक राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राजभवनात थेट मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे पवार कुटुंबीयामध्ये राजकीय आणि कौटुंबीक फूट पडल्याचं स्पष्ट झालं.

शपथविधी झाला पण भाजपसमोर पक्षांतरबंदी कायद्याचा पेच, काय आहे हा कायदा?

याशिवाय सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर राजकीय आणि कौटुंबीक फूट असं स्टेटस अपडेट करत हे मान्य सुद्धा केलं की पवार कुटुंबात आता एकी राहिलेली नाही. त्यांचं हे स्टेटस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. यानंतर या कौटुंबीक फूटीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना कुटुंबात फूट पडल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कुटुंब आणि पक्ष दोन्ही वेगवेगळ्या जागेवर आहेत असं शरद पवार यांनी सांगितलं. या विषयावर जास्त काही बोलणं त्यांनी जाणीवपूर्वक टाळल्याचं यावेळी दिसून आलं.

अजित पवारांबद्दल काय म्हणाले शरद पवार? वाचा पत्रकार परिषदतले 10 मुद्दे

दरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटर वरुन दिली. सध्या महाराष्ट्रात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट पडलेले दिसत आहेत. दरम्यान अजित पवारांनंतर रोहित पवार यांचं पुढंच पाउल काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण रोहित पवार यांनी त्यांचं फेसबुक प्रोफाइल फोटो बदलत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी शरद पवारांसोबतचा एक फोटो प्रोफाइलवर लावला त्यावर ते शरद पवारांसोबत असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रात 'महाविकासआघाडी'चे सरकार येणार, शरद पवारांचा नवा दावा

===========================================================================

First published: November 23, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading