अजित पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? शरद पवारांनी दिलं उत्तर

अजित पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? शरद पवारांनी दिलं उत्तर

अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदारून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यांना पक्षातून काढण्यात आलेलं नाही.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या विरोधात जात भाजपसोबत सलगी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदारून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यांना पक्षातून काढण्यात आलेलं नाही. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

'अजित पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार का?' असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'पक्षातून काढणं हा निर्णय एखाद्या व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचा असतो. त्यामुळे याबाबत काय करायचे याचा निर्णय पक्ष घेईल.'

भाजपविरोधी भूमिकेवर शरद पवार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडला गेलेल्या शरद पवार यांनी चव्हाण यांच्या योगदानाबद्दल भाष्य केलं आहे. तसंच राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार यांच्या कराडमधील पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- ज्यांनी देशाला योगदान दिलं त्यांच्या स्मरणाचा आजचा दिवस

- यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल पवार यांची कृतज्ञाता

- महाराष्ट्रचे जीवन सुखी समृद्ध व्हावं हीच प्रार्थना केली

- मुख्यमंत्री निवड वैध की नाही हे न्यायालय ठरवेल त्यावर बोलणं उचित नाही

- भाजपला पक्षाचा पाठिंबा नाही, आम्ही त्यात सहभागी नाही

- राज्यपाल सांगतील त्यावेळी मतदान होईल

- अजित दादांचा निर्णय - पक्ष सहमत नाही

- अजित पवार हकालपट्टी बाबत पक्ष ठरवेल

Published by: Akshay Shitole
First published: November 25, 2019, 10:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading