मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

येत्या 10 दिवसांत पंतप्रधानांची भेट घेणार, शरद पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

येत्या 10 दिवसांत पंतप्रधानांची भेट घेणार, शरद पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले

शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले

शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले

  • Published by:  sachin Salve
उस्मानाबाद, 18 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबादमधील अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर 'येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी', अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहे. परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उस्मानाबादेत दाखल झाले आहे. शहरात दाखल झाल्यानंतर  शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 'शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. परतीच्या पावसामुळे कधी न भरून येणार नुकसान झाले आहे. या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भेट घेणार आहे, असंही शरद  पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच्या त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. उस्मानाबादमध्ये त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी पवारांना त्यांच्या व्यथाही सांगितल्या. पाहणीच्या वेळी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, आज सकाळी जेव्हा शरद पवार हे सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी हेलिकॉप्टरने दाखल झाले. शरद पवार हे उस्मानाबादेत येणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ एकच गर्दी केली होती. शरद पवार आपल्या ताफ्याकडे जसे पुढे वळले तसा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच गराडा घातला. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जाते आहे. मात्र हा नियम शरद पवार यांच्या समोरच तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पायदळी तुडवत होते. त्यामुळे खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगू लागले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सुरक्षारक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले.
First published:

पुढील बातम्या