स्वबळावर भगवा फडकवणार! हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, शरद पवारांचा सेनेला टोला

स्वबळावर भगवा फडकवणार! हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, शरद पवारांचा सेनेला टोला

भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये.

  • Share this:

नाशिक, 28 ऑक्टोबर: शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून  शिवसैनिकांना सांगितलं जात आहे, यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलो आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवसेनेचे कान उपटले.

दरम्यान, महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला.

शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. कांदा व्यापारी, शेतकरी, बाजार समितीच्या संचालकांशी शरद पवार यांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अघोषित कांदा लिलाव बंदवर चर्चा केली. कांदा प्रश्नावर तोडगा काढा, असं व्यापाऱ्यांनी शरद पवारांकडे मागणी केली. केंद्र सरकारला स्टॉक लिमिट रद्द करण्याची विनंती करा, असं साकडं देखील व्यापाऱ्यांनी घातलं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा...शरद पवारांच राज्यपालांना खरमरीत पत्र, पुन्हा सुनावले खडे बोल

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांना सांगत असेल. पण हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का? हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी यावेळी दिला.

जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का?

दरम्यान, धाडी, आयात, निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत. मात्र, जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला खडसावलं आहे.

निर्यात बंद, आयात सुरू हा निर्णय अतर्क्य आहे. कांदा, ट्रान्सपोर्टेशन 25 टन मर्यादा देखील चुकीची आहे. या मुद्द्यावर आपण केंद्राशी चर्चा करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयानं हा प्रश्न सुटू शकतो. राज्य सरकार कडून फार या प्रश्नावर अपेक्षा करू नये, असं देखील शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कांदा व्यापारी, शेतकरी, बाजारसमिती संचालकांशी शरद पवार यांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अघोषित कांदा लिलाव बंदवर चर्चा केली. कांदा प्रश्नावर तोडगा काढा, असं व्यापाऱ्यांनी शरद पवारांकडे मागणी केली. केंद्र सरकारला स्टॉक लिमिट रद्द करण्याची विनंती करा, असं साकडं देखील व्यापाऱ्यांनी घातलं. त्यानंतर शरद पवार यांनी

हेही वाचा..आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा घोटाळा, फडणवीसांनी पत्र लिहून केले गंभीर आरोप

शरद पवार म्हणाले, महाग कांदा वाण विकणाऱ्या सिड्स कंपनीविरुद्ध तक्रारीची दखल घेतली जाणार आहे.

सरकार याची चौकशी करेल. केंद्र सरकारशी चर्चा करून तक्रार निवारण करू. मात्र, मार्केट बंद करू नका. शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होऊ देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या