हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन- शरद पवार

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन- शरद पवार

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असं मजेशीर विधान माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काल बारामतीत केलंय.

  • Share this:

बारामती, 19 ऑगस्ट : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असं मजेशीर विधान माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काल बारामतीत केलंय. राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण हवामान खात्यातील काही तज्ज्ञ लोकांनी काल मला सांगितले की, राज्यात लवकरच चांगला पाऊस पडेल, त्यांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, त्यांचे म्हणणं खरं ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असं वक्तव्य माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बारामतीत व्यक्त केलंय.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आपण असमाधानी असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. मला, शेतकरी माझं कर्ज माफ झाले असे पत्र बॅंकेत दिलंय, असे मला कुठे दाखवत नाही, असे म्हणत त्यांनी कर्जमाफीच्या घोषणेबाबतही नाराजी व्यक्त केली. जागतिक मधमाशी दिवस व कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पवारांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

First published: August 19, 2017, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading